Kiti Sawarava / किती सावरावा
किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल
काळजाच्या आजारा
सापडंना उतारा
बेईमान चांदवा
भोगतोय अंधारा
किती सावरावा तोल
हो, काही सुचना, काही कळंना
आकरीत घडलं हे सारं
विसरून भान, धावतं मन
कानात भरून वारं
हो, काही सुचना, काही कळंना
आकरीत घडलं हे सारं
विसरून भान, धावतं मन
कानात भरून वारं
याला प्रेम म्हणावं की आग?
भरं जखम उरावा डाग
हो, किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल, खोल
तुझी आठवण येता
हारवती चोरवाटा
कशी पडली जीवाला रानभूल
डोळा डसलं सपान
उरे अधूरच गाणं
घट्ट नात्यातली वीण झाली सैल
हो, उभा जन्म हा जाळावा
तुझ्या एका सावलीशी
वाट बासरी पाहाते
कधी राहीन ओठांशी
याला प्रेम म्हणावं की आग?
भरं जखम उरावा डाग
याला प्रेम म्हणावं की आग?
भरं जखम उरावा डाग
हो, किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल, खोल
गीत : किती सावरावा
गीतकार : मंदार चोळकर, अमितराज
गायक : आदर्श शिंदे आणि जानवी प्रभू अरोरा
संगीत लेबल: T-Series Marathi