Lajran Sajra Mukhda / एक लाजरान साजरा मुखडा
मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
तुझ्या रुपाचं गोंदन, माझ्या मनात हा भिनला
मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
तुझ्या रुपाचं गोंदन, माझ्या मनात हा भिनला…
एक लाजरान साजरा मुखडा, याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा, की जीव आज गुतला ग
एक लाजरान साजरा मुखडा, याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा, की जीव आज गुतला ग
तुझं रूप हे नक्षत्राचं, जनु बहरल्या रानाचं
तुझ्या रूपामंधी हरलो मी, काय होईल या खुळ्या मनाचं
आल सोलावं वरीस प्रेमाचं, नात जडलय तुझं नी माझं
तुझ्या नजरला भुललो मी, आभाळ फुटलय माझ्या मनाचं
तुझ्यासाठी मी आंदन आनली माझा इश्काची दौलत ही
तुझ्यासाठी मी आंदन आनली माझा इश्काची दौलत ही…
एक लाजरान साजरा मुखडा, याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा, की जीव आज गुतला ग
कशी सांगु मी सख्या तुला रं
लाज दाटुन आली मनामंधी
ग्वाॅड सपान हे खुललय रं
याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी
माझं काळीज हे इरघळलं
आहे मायेची उब तुझ्या मिठीमंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी…
एक लाजरान साजरा मुखडा, माझ्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा, की जीव आज गुतला ग
एक लाजरान साजरा मुखडा, माझ्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा, की जीव आज गुतला ग…
गीत : एक लाजरान साजरा मुखडा
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : केवल वाळंज सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Prashant Nakti Official