Mala Gaav Jevha Disu Lagle / मला गाव जेव्हा दिसू लागले
मला गाव जेव्हा दिसू लागले..
लुळे पाय माझे रुसू लागले !
लपंडाव माझातुझा संपला
तुझे तेच माझे असू लागले !
तुझ्या अंतरी कोणती वादळे
मला हेलकावे बसू लागले !
अशी ही कशी तीच ती उत्तरे?
मला प्रश्न माझे हसू लागले !
गीत: सुरेश भट
संगीत: रवि दाते
स्वर: सुरेश वाडकर