चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लता मंगेशकर

Manasarakhe Zale Majhya Marathi Lyrics | मनासारखे झाले माझ्या

Manasarakhe Zale Majhya / मनासारखे झाले माझ्या

जादुगिरी ही कोणी केली, कळुनी नाही आले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !

मज कळले नाही काही मी कधी पाहिले त्यांना
मज कळले नाही बाई मी काय बोलले त्यांना
हसले माझे ओठ म्हणू की हसले माझे डोळे ?
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !

ते सद्गूण की ते रूप मज काय नेमके रुचले
ते निसर्गजीवन दिसता मज काय नेमके सुचले
माया-ममता माझ्याभवतीं विणती कैसे जाळे ?
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !

हे वेड अनामिक आहे की अधीरता ही मनची
उघड्याच लोचनी दिसती स्वप्‍ने ही जागेपणची
मला न कळता माझ्या हाती साज असा हा ल्याले !
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !

 

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: घरची राणी
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते