Mi Maj Harpun Basale / मी मज हरपुन बसले ग
मी मज हरपुन बसले, ग
आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले, ग
साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले, ग
त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले, ग
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले, ग
त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले, ग
दिसला मग तो देवकिनंदन अन् मी डोळे मिटले, ग
गीत: सुरेश भट
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: आशा भोसले
गीत प्रकार: भावगीत