Nahi Kashi Mhanu Tula / नाही कशी म्हणू तुला
नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने: आड येते रीत.
नाही कशी म्हणू तुला… येते जरा थांब
परि हिरव्या वळणांनी जायचे न लांब.
नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परि नीट, ओघळेल, हासतील कोणी.
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परि नको अधरांचा मोडू सुमडाव.
नाही कशी म्हणू तुला, जरा लपूछपू
परि पाया खडेकाटे लागतात खुपू.
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी.
गीत: आरती प्रभू
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत