Navika Chal Tethe / नाविका चल तेथे
नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे
जिथे उन्हाचा स्पर्शही लोभस
सरगम गुंजत झरतो पाऊस
फुलासारखे तिथे फुलावे तुझे नि माझे जिणे
मखमालीची जिथली हिरवळ
मुळी न सुकते सुमनांचे दळ
अवकाशाच्या तारा छेडी वारा मंदपणे
प्रिय नयनातील भाव वाचता
चुकून दिसावा मोर नाचता
दूरदेशीचे बुलबुल यावे कधी मधी पाहुणे
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: एकटी
गीत प्रकार: चित्रगीत