Saavar Re Mana / सावर रे मना
सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची
वात हळवी वेचताना सावर रे मना
सावर रे ,सावर रे ,सावर रे एकदा , सावर रे
सावल्या क्षणांचे भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना सावर रे मना
सावर रे ,सावर रे ,सावर रे एकदा ,सावर रे
भान उरले ना जगाचे ना स्वतःचे
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे
फितूर झाले रात दिन तू सावर रे
सावर रे मना ,सावर रे
सावर रे एकदा ,सावर रे
मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
येतील आता आपुले ॠतू
बघ स्वप्न हेच खरे
पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्याचे
पानगळ ही सोसताना सावर रे मना
सावर रे मना ,सावर रे
सावर रे एकदा ,सावर रे
सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची
वात हळवी वेचताना सावर रे
सावर रे ,सावर रे
गीत : सावर रे मना
गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर
संगीत लेबल: Video Palace