Tu Ashi || तु अशी
तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं
साथ ही सोडूनी गेलीस का सांग ना पाश हे तोडूनी
दूर का भासे हा प्रितीचा किनारा
एकट्या वाटेवर बस तुझा सहारा
तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं
साथ ही सोडूनी गेलीस का सांग ना पाश हे तोडूनी…
तुझ्या-माझ्या मनातले
ओठी आले अलवार
दोघातले अंतर हे
विरेल ग हळूवार
बहरले क्षण सारे
तुझ्या एका हाकेवर
भेटलीस तु मला
पुन्हा त्या वाटेवर
जग सारे का भासे हे रिते
जग सारे का भासे हे रिते
ओढ ही का अंतरी तुटे
ओढ ही का अंतरी तुटे
सांगना वेड्या मना
प्रेम ही झाला गु्न्हा
सांगना वेड्या मना
प्रेम ही झाला गु्न्हा
झाला गु्न्हा…
तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं
साथ ही सोडूनी जाऊ नको थांब ना पाश हे तोडूनी
मिटलेल्या पापण्यांनी
साठवले क्षण चार
पाणावले डोळे अन् मी
पुन्हा तिथेच एकटा यार…
गीत : तु अशी
गीतकार : Sushant Rajendra Bapardekar , Vipul Shivalkar
गायक : केवल वाळंज
संगीत लेबल: टिप्स मराठी