Tu Mi Re Sajana / तू मी रे साजणा
तू….. मी…… रे साजणा !
कुणी कुणा हरविले,
कुणी कुणा जिंकियले
खरं खरं सांग ना !
स्वप्नात मी दंग झाले
मी नवतीचा रंग ल्याले
लाटांवरी खेळ चाले
प्रीतित मी चिंब न्हाले
डोलते मी तालावरी,
लाज माझ्या गालावरी लपविता राहिना !
हा मंद हा धुंद वारा
वेड्या मिठीचा शहारा
एकांत देई इशारा
नौकेस लाभे किनारा
सारे सारे तुझ्यामुळे,
सारे सारे तुला दिले,
भोळी माझी भावना !
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: चंद्र होता साक्षीला
गीत प्रकार: चित्रगीत