आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी स्फूर्ती गीत

Udyogache Ghari Devata Marathi Lyrics | उद्योगाचे घरी देवता

Udyogache Ghari Devata / ​उद्योगाचे घरी देवता

उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी
जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी

दुर्दैवाचे पहाड फोडू
अमोल दौलत खणुनी काढू
मातीमधुनी सोने लपले, धरणीच्या उदरी

उभ्या पिकाची हिरवी पाती
कणसांमधले जपती मोती
खळ्यात पडल्या डोंगरराशी, लुटुया दौलत खरी

दैव आमुचे आम्ही घडविले
भाग्यदान हे पदरी पडले
जगावेगळे वास्तुशिल्प हे, कृष्णाची नगरी

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: प्रभाकर जोग
स्वर:  आशा भोसले
चित्रपट: थांब लक्ष्मी कुंकू लाविते
गीत प्रकार: स्फूर्ती गीत, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते